Red ramblings

Red ramblings are about my experiences in Shanghai life. My observations - colored by my viewpoint :-)

Sunday, July 19, 2026

खिडकी


*खिडकी*


माझ्या मनाच्या खिडकीतून 

डोकावून मी पाहते हळूच 

बाहेरच्या जगाकडे

मनावर आदळत असणाऱ्या अनुभवांकडे. 


कधी दिसते मला खूप आशा

तर कधी घोर निराशा! 

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर 

खेळत असते माझी भावना! 


माझ्या मनाच्या खिडकीतून 

डोकावून पाहते मी

माझ्याच मनामधल्या

चाललेल्या घालमेलीकडे. 


भावनांना असतात रंग

हे तेव्हा मला समजते,

मग निराशेच्या करड्या रंगात

आशेचा हिरवा रंग मी शोधते. 


मनात आणि मनाबाहेर 

डोकवायला खिडकी एकच असते

मीच आतबाहेर करत राहते अन्

मन माझे तपासत राहते! 


अभिजित टोणगांवकर/ जुलै २०२६  

0 Comments:

Post a Comment

<< Home